कोविड डायरी...
एका अस्वस्थ मनाची....
जानेवारी 2020 ....
31 डिसेंबर 2019 ला निरोप आणि जानेवारी 2020 चं स्वागत रीतसर साजरं झालं. तशी व्यक्तिशः मी असल्या सेलिब्रेशनच्या फंदात फारशी पडत नाही पण राष्ट्रीय कुळाचार असल्याप्रमाणे या उत्सवात थोडं का होईना,नाईलाजास्तव ओढल्या जातेच. मग दरसाल दरवर्षी प्रमाणे नववर्षाचे थातूरमातूर संकल्पही करून झाले . .........अहो,शास्त्र असतं ते....
दरम्यान वुहानमध्ये कोरोना नामक नवीनच एका साथीच्या उद्रेकाच्या भीषण बातम्या बघितल्या......
चीनमधे ना??आपल्याला काय त्याचं ???
शेवटी परदुःख शीतलम्.......
आपल्या झोपेचं खोबरं कशाला?
फेब्रुवारी 2020...
इटलीमध्ये कोरोनामुळे हजारो लोक मृत्युमुखी पडत आहेत.. स्मशानभूमीत जागा कमी पडते आहे....
पोटात गोळा उठला जबरदस्त!
पण भारतातल्या 45 डिग्री सें. तापमानात हा विषाणू कसला तगतोय??
जीव शांतवला जरासा.
नेहमीसारखीच गाढ झोप लागली .
मार्च 2020 ....
पुण्यात पहिला कोरोना रुग्ण.. मुंबईत पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू.......
जीव धास्तावला आहे....
बुद्धीला जरा बाजूला ठेवून थाळीनाद केला.
दिवे उजळले .
सामूहिक कर्फ्यू .....
थोडासा दिलासा मिळाला.
होईल सगळं व्यवस्थित.....
साथीचे रोग येतातच की आणि जातातही......
शांत झोप लागली.
एप्रिल 2020....
भारतात कोरोना बाधितांची संख्या वाढली.
जिल्हाबंदी ,शाळा, कॉलेज, ऑफिस, कारखाने, दुकानं, बसेस, रेल्वे, सगळं बंद.
फक्त आमचे दवाखाने सुरू.. "ऑन ड्युटी डॉक्टर" हे लेबल गाडीवर शौर्य पदका सारखं लावताना ऊर नक्कीच भरुन आला.
आटोक्यात येणार ही साथ........
फ्लूचा मोठा भाऊ हो......
उत्साहानं शासनाचे कोविड१९चे ऑनलाईन ट्रेनिंग्ज घेतले.
सात लेव्हल्सचे सर्टिफिकेट्स जमा झाले.
कोविडची वैद्यकीय आणि वैज्ञानिक बाजू क्लियर झाल्यामुळे हिरीरीने समाजात ज्ञानवाटप आणि जनजागरण सुद्धा केलं.
काढे,वाफ,नस्य- दिनक्रमात जोडल्या गेले.
एसी, कुलर, थंड पाणी, आईस्क्रिम, सरबत, पन्हं,ई. नसतानाही रात्रीची झोप मात्र निवांत होती.
मे -जून-.जुलै 2020 ...
कोरोना बाधितांचा आकडा दिवसागणिक वाढतोय....
मृत्युदर वाढत चाललाय...
बरे झालेल्या रुग्णांच्या मोठ्या संख्येपेक्षा मृतांचा आकडा कमालीचा छळतोय....
हा विषाणू आता मनात आलाय वस्तीला ....
कुठेतरी कुणाचा तरी -- श्वासासाठी संघर्ष ......
कुठेतरी भुकेल्यांचा- - अन्नासाठी संघर्ष........
कुठेतरी एकाकी असहाय व्यक्तिचा- - आधारासाठी संघर्ष....
सर्व स्तरातील कोविड योद्ध्यांचा - -- कामासाठी घरदार सोडतानाचा संघर्ष......
फॉरिन टूर रद्द झाल्यामुळे कुणाचा तरी- - पंचतारांकित,कोमट संघर्ष .....
आम्ही सुरक्षित आहोत. सगळं कुटुंब एकत्र आहे ..... हा स्वार्थी दिलासा खुपत होता कुठेतरी..
आज आश्वस्त वाटतंय पण उद्या?????
आता रात्री दचकून जाग येतेय.. भीषण सावट आलंय मनावर.. काही लक्षणं नसतानाही, घरातल्यांच्या नकळत पल्सऑक्सीमीटर उशीखाली लपवून झोपणाऱ्या डॉक्टरांची ही संख्या वाढते आहे.......
ऑगस्ट-सप्टेंबर 2020....
आता तर कोरोना विषाणू मनातून अंतर्मनात ही शिरलाय...
वृत्तपत्र वाचन बंद केलंय..
बातम्या बघणं बंद केलंय... तरीही येतेच ती दुष्ट, क्रूर बातमी- निकटवर्तीयाच्या मृत्यूची....
मृत्यूनं मन हेलावणं हे स्वाभाविकच .
पण या कोरोनानं मृत्यूची थरकाप उडवणारी निष्ठूर बाजू दाखवली.
प्लास्टिक मध्ये गुंडाळून, एकटेपणाला सोबत घेऊन येणारं मृत्यूचं विदारक रुप.....
दुःखाला बधीर करणारं....
कुठे आई वडिल दवाखान्यात ...
छोटी मुलं घरी एकाकी.......
वारंवार गळ्याशी आवंढा दाटून येणं वाढलंय आताशा.
मनातला कोरोना धुमाकूळ घालतोय......
ऑनलाइन गाणी, नाच, रेसिपीज,समुपदेशन, लेक्चर्स योग साधना..... यांनी कसाबसा थोपवलेला हा मनातला विषाणू उचल खातोय परत परत......
हाऊसिंग सोसायट्यांच्या गार्डन मधला शुकशुकाट, स्तब्ध झोपाळे आणि एकाकी घसरगुंड्या बघून पोटात गोळा उठतोय.....
मनातल्या विषाणू साठी कसा करावा लाॕकडाऊन???
मध्यरात्री झोप उघडली की परत डोळा लागतच नाहीय...
आॕक्टोबर - नोव्हेंबर २०२०
.... वरवर तसं सुरळित चाललंय..
मन मात्र धास्तावलेलंच आहे. दिवाळीनंतर करोनाची दुसरी लाट येणार????
सण-उत्सव घरच्या घरी होताहेत साजरे.अवतीभोवती बरचसं सकारात्मक,रचनात्मक घडतंय.......
मनातल्या विषाणुचा जोर कमी झाल्यागत वाटतोय..
पण मनाच्या चिंधड्या व्हायच्या त्या झाल्याच.
पण नाही.
आता हतबल व्हायचं नाही.
डिसेंबर 2020 .....
भारतातील कोविडचं चित्र दिलासादायक... कोरोनाची लस ही येणार........ विषाणूच्या थैमाना पुढे माणसाची जगण्याची धडपड वरचढ ठरली हे निश्चित.
पण या दहा महिन्यातल्या मनाच्या पडझडीचं काय?? मनात वस्तीला आलेल्या विषाणूला कसं हद्दपार करायचं???
मानसिक कोविड मधून बरं होणाऱ्यांचं प्रमाण किती टक्के???
मनाच्या कोविडवर आहे का हो लस???
नाही....अशा विचारांच्या गुंत्यात अजिबात अडकायचं नाही.
शंभर क्षण सावरण्याचे आणि एकच क्षण कोसळण्याचा आहे..
झटकायचा तो क्षण .......
जानेवारी २०२१....
असो.....
प्रत्येक काळ्या ढगाला रुपेरी किनार असतेच.मनाच्या कोविडची लस आपली आपल्या जवळच आहे ,हे जाणवतंय... फक्त ती शोधण्याची दृष्टी आणि वृत्ती पाहिजे...
.कोविडनंच शिकवलंय ना हे???? पाय रोवून उभं राह्यला....
"दुःखेष्वनुद्विग्नमनाः
सुखेषु विगतस्पृहः/
वीतरागभयक्रोधः
स्थितधीर्मुनिरुच्यते//"
ही गीतेतली लस रोज समजून,उमजून स्वतःला टोचत राहणं......हा संकल्प करावा का
नवीन वर्षाचा???
जमेल???
कारण संकल्प अल्पजीवी असतात ...
असू दे.तो विचार आता नाहीच करायचा.
पंतप्रधान मोदींच्याच शब्दात सांगायचं तर,
"न अपना न पराया
न तेरा न मेरा,
सबका तेज बनकर
अभी तो सूरज उगा है".
"विकृतिने प्रकृतिको दबोचा
अपनोंसे ध्वस्त होती आज है,
कल बचाने और बनाने
अभी तो सूरज उगा है.

सर्वांच्या मनातलं.....
ReplyDeleteहुबेहुब...
भावनांना शब्दरुप देण्याचे तुमचे कौशल्य अलौकीक आहे.वाचताना प्रत्येक गोष्ट आपल्या आयुष्याला जोडली जाते .
ReplyDeleteअप्रतिम लेखन
मनोभावों का शब्दांकन अतिसुंदर, सटीक,
ReplyDeleteमनाची तगमग खुप अप्रतिम वर्णन केली मॅडम. काळ पुढे सरकला आहे पण धास्ती अजून कायमच आहे. वरवर पाहता सगळं आलबेल आहे पण अंतर्मनातील खळबळ अस्वस्थ करतेच आहे. 👌👌
ReplyDeleteKharokhar phar sunder manastithi
Deleteडोळ्यात पाणी आणणारे लिखाण.
ReplyDeleteअवस्थ करणारे लिखाण.
मनाचा शोध घेणारे लिखाण.
वास्तव दाखविणारे लिखाण
सलाम लिखाणाला
Superb maam
ReplyDeleteमनातली डायरी
ReplyDeleteप्रत्येकाला वाटतयं माझेच विचार व्यक्त झालेय !!! तेही अगदी मोजक्या शब्दात !! खूपच छान !!!
ReplyDeleteनितांत सुंदर.भावस्पर्शी.
ReplyDeleteएक वीस गेलं एकवीस आलं.उमेदीच्या दवबिंदूनी मन न्हाहून निघालं.हार्दिक शुभेच्छा🙏🌹 असं म्हणू या आपण सर्व.
राजेंद्र मेंडकी
अगदी मनातले भाव व्यक्त केलेस.कोविड19चे वादळ आपण बेसावध असताना आले काय आणि ज्या तऱ्हेने त्याने सर्वांगाने आपला विध्वंस केला आहे ते बघता 'भय इथले संपत नाही'अशीच अवस्था आहे.या स्थितीत स्वत:सोबतच इतरांना सावरणे ,सकारात्मकता ठेवणे याशिवाय पर्याय नाही.वो सुबहा कभी तो आयेगी...म्हणून Happy New Year.
ReplyDeleteअगदी मनातलं लिहिलंस,मनावरचं सतत भीतीच सावट अस्वस्थ करत राहत,आज माझ्या मुलीच्या लग्नाला 15 दिवस झाले.हुश्श केलं ,सगळे सुखरूप आहोत म्हणून..काय हे कसं जगतोय अस वाटत राहतं ,सवय पण झालीय बऱ्याच गोष्टींची,तरी नॉर्मल जगणं कधी सुरू होईल याचीच आस लागलीय.
ReplyDeleteकोविड डायरी
ReplyDeleteजानेवारी ते डिसेंबर हा सर्व कालावधी अगदी सर्वांच्या मनातला आपण कागदावर उतरवत कमाल केली.
खरोखर असच सर्वांचं वर्षभर जगणं होते.
अगदी क्षण न क्षण असेच आपण जगलो.
ती थरकाप उडवणारी भीती अजूनही मानगुटीवर बसलेली आहेच.
किती जणांचे संसार उदध्वस्त झाले असतील,किती देशोधडीला लागले असतील,किती मुलं पोरकी झाली असतील हा विचार मनात आला तरी थरकाप उडतो.
पण वाईट यांचे वाटते की बहुतेक लोकं नियमाचे पालन न करता बिनधास्त वावरतात. स्वतः बरोबर दुसऱ्यांचा जीवही धोक्यात घालतात.
शेवटी एकच प्रार्थना २०२१ या वर्षात हे मळभ दूर व्हावे
संपूर्ण वर्षभराच्या मनस्थितीचा अचूक आढावा. छान.
ReplyDelete- चारूदत सहजे.
कोविड डायरी, खूप छान, अप्रतिम👌👍
ReplyDeleteसर्वांच्या मनातील भीती, विचार उत्तम रीतीने व्यक्त केले मॅडम
ReplyDeleteKhup chhan ani innovative way ni lihilela .
ReplyDeleteकोरोना काळातील अस्वस्थ मनाचे वर्णन खूप छान.
ReplyDeleteकोरोना काळातील अस्वस्थ मनाचे वर्णन खूप छान.
ReplyDeleteकोरोना काळातील अस्वस्थ मनाचे वर्णन खूप छान.
ReplyDeleteखूप छान वर्णन.
ReplyDeleteमन खिन्न करणाऱ्या २०२० च्या आठवणी आणि आशादायी २०२१, यांचं यथार्थ वर्णन. दुसऱ्याच्या जीव वाचवण्यासाठी स्वतःची पर्वा न करणाऱ्या तुमच्यासारख्या वैद्यकीय पेशातील देवदूतांना सलाम!
ReplyDelete🙏
नेहमी प्रमाणे अप्रतिम लेखन. अगदी मनातलं. अस्वस्थता नेमकी मांडली. आशय आणि लेखनाची स्टाइल-- दोन्ही अत्युत्तम. 👏👏
ReplyDeleteमाधवी सहजे
मनातल्या भीतीच खूप छान वर्णन ..जीवघेण्या कोरोना ने खरोखर सगळ्यांना हलवून सोडलं ...छान लिहिलं. अप्रतिम
ReplyDeleteवाचताना वाटलं की अगदी आपल्याच मनातले भाव कसे काय इतक्या अचूकपणे कळू शकतात कोणाला ! टप्प्याटप्प्याने असाच प्रवास घडला आहे कोरोनाचा आणि त्याबरोबर आपल्या भावनिक आंदोलनांचा . यथार्थ वर्णन ! फक्त हे असं लिहिण्याची वेळ कोणावरच आली नसती तर कित्ती बरं झालं असतं !
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteवास्तवाचे चित्रण करण्याची तुमची शैली अप्रतीम आहे .
ReplyDeleteAmazing writing
ReplyDeleteDr. Mrudula Muley
Really great
ReplyDeleteसगळ्यांच्या मनातील भाव. भावनांना शब्दात उतरविण्याचे सामर्थ्य खूपच छान. Covid-19 मुळे ज्यांना आम्ही गमावले त्यांच्या आठवणीने मन गलबलून जाते.
ReplyDeleteसुलेख + सुरेख लेखन। बस्तूतः शाब्दिक सटिक वर्णन जे कोरोना चे पूर्ण चित्रण डोळ्यासमोर स्पष्ट करते।
ReplyDeleteReally great 👍 and great
👏👌👏✌ 2good
ReplyDeleteछानच
ReplyDeleteमनस्थिती परफेक्ट वर्णन केलीय ... मी अनेक covid मुळे झालेले मृत्यू जवळून बघितले... आपण ती खरी तगमग समजू च शकत नाही ..ते जवळचे नातेवाईक असतात पण दूर ..नुस्त मनाला समजावत मृत्यू च अर्थ लावत ... लॉकडाऊन सहन केलंय अनेकांनी.. ते शब्दात येऊ नाही शकत . तरीही हे लिहिलेलं खूप अचूक काही सांगून गेलं ...परदुख शीतल...किंवा झटकायचा तो क्षण ..
ReplyDeleteमनस्थिती परफेक्ट वर्णन केलीय ... मी अनेक covid मुळे झालेले मृत्यू जवळून बघितले... आपण ती खरी तगमग समजू च शकत नाही ..ते जवळचे नातेवाईक असतात पण दूर ..नुस्त मनाला समजावत मृत्यू च अर्थ लावत ... लॉकडाऊन सहन केलंय अनेकांनी.. ते शब्दात येऊ नाही शकत . तरीही हे लिहिलेलं खूप अचूक काही सांगून गेलं ...परदुख शीतल...किंवा झटकायचा तो क्षण ..
ReplyDelete