Showing posts with label कविता. Show all posts
Showing posts with label कविता. Show all posts

Friday, April 24, 2026

किताबे

 जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने गुलजार यांनी लिहिलेल्या पुस्तकांविषयीची कविता आठवली नाही तरच नवल.

किताबें झाँकती हैं बंद आलमारी के शीशों से

बड़ी हसरत से तकती हैं

महीनों अब मुलाकातें नहीं होती

जो शामें उनकी सोहबत में कटा करती थीं

अब अक्सर गुज़र जाती है कम्प्यूटर के पर्दों पर

बड़ी बेचैन रहती हैं क़िताबें

उन्हें अब नींद में चलने की आदत हो गई है

जो कदरें वो सुनाती थी कि जिनके

जो रिश्ते वो सुनाती थी वो सारे उधरे-उधरे हैं

कोई सफा पलटता हूँ तो इक सिसकी निकलती है

कई लफ्ज़ों के मानी गिर पड़े हैं

बिना पत्तों के सूखे टुंड लगते हैं वो अल्फ़ाज़

जिनपर अब कोई मानी नहीं उगते

जबां पर जो ज़ायका आता था जो सफ़ा पलटने का

अब ऊँगली क्लिक करने से बस झपकी गुजरती है

किताबों से जो ज़ाती राब्ता था, वो कट गया है

कभी सीने पर रखकर लेट जाते थे

कभी गोदी में लेते थे

कभी घुटनों को अपने रिहल की सूरत बनाकर

नीम सजदे में पढ़ा करते थे, छूते थे जबीं से

वो सारा इल्म तो मिलता रहेगा आइंदा भी

मगर वो जो किताबों में मिला करते थे सूखे फूल

और महके हुए रुक्के

किताबें मँगाने, गिरने उठाने के बहाने रिश्ते बनते थे

उनका क्या होगा

वो शायद अब नही होंगे.........

या अप्रतिम कवितेची पारायणं करता करता मलाही काहीतरी सुचलंय.


कपाटात बंद असलेली पुस्तकं बघत असतात काचेतून आपल्याकडे,

कधी आशेनं 

कधी असहाय्यतेनं.

शब्दांपलिकडलं बरंच काही सांगत असतात पुस्तकं.

काही घुसमटत असतात.

काही गुदमरत असतात.

काही पुस्तकांना सलत असतो बुकमार्क,

खूप काळापासून शरीरात असलेल्या फॉरीनबॉडी सारखा.

काही गुळगुळीत कव्हर पांघरुन उभी असतात,

मॅनीक्वीन सारखी.

काही जीवापाड सांभाळतात - सुकलेल्या फुलाला, एका विस्मृतीतील  इतिहासाला.

काही आसुसलेली असतात, जिवंत स्पर्शासाठी.

काही मिरवतात हायलाईटरच्या खुणा, दागिन्यांप्रमाणे.

काही फक्त असतात, कोमात गेलेल्या पेशंटप्रमाणे,मृतवत.

काही अस्वस्थ होतात, सतत हाताळल्याने. 

काही उपरी असतात, सतत आपल्या घराकडे डोळे लावलेली.

शब्दांपलिकडलं बरंच काही सांगत असतात पुस्तकं.

कधी काळी हीच पुस्तकं वाचता वाचता, त्यांचीच ऊब पांघरुन गाढ झोप येत असे.

कितीतरी पुस्तकं अंगाखांद्यावर विसावत असत.

काही पुस्तकांवर कपाळाचा डाग पडलाय, नतमस्तक होतांना.

आणि ते वेगवेगळे बहाणे?

पुस्तकांची देवाणघेवाण आणि त्यात लपलेली सूचक चिठ्ठी.

नाजूक नात्यांना दृढ करणारी पुस्तकं.

संपुष्टात आलंय सगळं.

दिवस ? महिने ?? वर्ष ???

कधी भेट झाली होती पुस्तकांशी ??

पुस्तकंही अस्वस्थ झालीय हल्ली.

शून्यात बघत, मूक आक्रोश करत,

काचेच्या कपाटात अर्धमेली होत असतात पुस्तकं.

शब्दांपलिकडलं बरंच काही सांगत असतात पुस्तकं !!!!!


#किताबे

#गुलजार






......................................................................

  मनोविकासाचे ध्यासपर्व     “सामाजिक कार्य सुरू करणं सोपं असतं पण ते जिवंत गतिमान, रसरशीत कसं ठेवायचं? कामातला जीवनरस कायम ठेवण्यासाठी व्यक्...