आई वडिलांच्या संपत्तीवर त्यांच्या वारसांचा जसा हक्क असतो तसाच त्यांच्या गुणांवर, प्रतिभेवर, वैशिष्ट्यांवर, सामर्थ्यावर, कौशल्यांवर हक्क असता तर?? पण असं नसतंच. कधी आई-वडिलांची गुणवैशिष्ट्ये अपत्यांमध्ये जशीच्या तशी उतरतात. कधी थोडी थोडी झिरपतात तर कधी अजिबात उतरत नाही. याला कोणताही नियम किंवा तर्क लागू होत नाही. यावर काही इलाजही नाही.
मी लिहीत असताना कायम मला माझ्या वडिलांची - डॉ म.बा.कुंडले - यांची आठवण येत असते. ते उत्तम लेखक , प्रभावी वक्ता, हाडाचा शिक्षक आणि प्रसिद्ध शिक्षणतज्ञ होते. त्यांचं चौफेर वाचन, व्यासंगी लेखन आणि मंत्रमुग्ध करणारं वक्तृत्व यापैकी काही थेंब तरी माझ्यात झिरपलेत का अशी शंका मला येते. असो. एका समृद्ध व्यक्तिमत्त्वाच्या पोटी माझा जन्म झाला हे ही नसे थोडके.
आज दिनांक १९ मे. आज त्यांचा वाढदिवस. आज ते असते असते तर ९४ वर्षांचे झाले असते. ते २०१४ साली आमच्यातून निघून गेले. माझ्या कोणत्याही 'लिंबू टिंबू' लेखनाचं - वडील म्हणून त्यांना खूप कौतुक होतं. पण त्यांना अपेक्षित असणारं लेखन माझ्या कडून होतं आहे की नाही देव जाणे. न सांगता येण्यासारखं आणि न दाखवता येण्यासारखं - पण माणूस म्हणून समृद्ध करणारं असं खूप काही, आम्हा तिघी बहिणींना त्यांच्याकडून मिळालं आहे. आणि त्या भक्कम पायावरच आज आमची वाटचाल सुरु आहे.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त काय करावं ,याचा मी बराच विचार केला.आणि माझ्या एका जबाबदारीची मला जाणीव झाली. बाबांनी अमूल्य असं अक्षरधन समाजातील शिक्षकांसाठी निर्माण करून ठेवलं आहे . ते अक्षरधन यानिमित्ताने समाजातल्या नवीन शिक्षकांसमोर आणण्याचं काम तर मी नक्कीच करू शकते.कितीतरी शिक्षकांच्या पिढ्या बाबांच्या पुस्तकांमुळे समृद्ध झाल्या आहेत.पण आजच्या गुगल युगातल्या ,अर्धवट माहितीवर विद्वान होणाऱ्या पिढीला, बाबांच्या पुस्तकांमुळे जर अस्सल ज्ञान मिळालं, तर बाबांच्या लिखाणाचं सार्थक होईल असं मला वाटतं.
विद्यापीठ पदव्युत्तर शिक्षण महाविद्यालयात (एम एड कॉलेज) बाबा प्रोफेसर होते. आणि आई बीएड कॉलेज मध्ये अध्यापक होती.एकत्र कुटुंब असतानाही त्या काळात ,मॕट्रिक झालेल्या आईला, बाबांनी बीए,एमए,बीएड,एमएड ते पीएचडी पर्यंत शिकण्यासाठी उत्तेजन दिलं.आम्ही तिघीही बहिणींनी आपल्या पायावर उभं राहिल्यावरच आमच्या लग्नाचा विचार करायचा,आणि त्या दृष्टीने, हवं ते शिक्षण पूर्ण करायचं,हे त्यांचं आधीच ठरलं होतं आणि तसं त्यांनी केलंही.
बाबांचं दुसरं पुस्तक म्हणजे 'शैक्षणिक तत्त्वज्ञान आणि शैक्षणिक समाजशास्त्र'. हे पुस्तक १९७३ साली, श्री विद्या प्रकाशन पुणे, यांनी प्रकाशित केलं. त्या वेळच्या बीएडच्या अभ्यासक्रमावर आधारित हे पुस्तक आहे. हे पुस्तक बीएड साठी, एक टेक्स्ट बुक म्हणून इतकं उपयुक्त ठरलं की त्याची तेरावी आवृत्ती निघाली आहे. त्या काळात या पुस्तकाला बीएडचा 'दासबोध' असं म्हणायचे. या पुस्तका संदर्भात एक गमतीशीर आठवण आहे. माझी लहान बहीण पुण्याच्या बीएड कॉलेज मध्ये नुकतीच रुजू झाली होती. त्यावेळेस तिची मुलगी लहान होती. तिला सांभाळून कॉलेजचं काम व्यवस्थित जमेल की नाही, हा तिच्या समोर प्रश्न होता. तिची सहाध्यायी तिला म्हणाली, 'अगं टेन्शन घेऊ नकोस, सरळ डॉ. म.बा. कुंडले यांचं शैक्षणिक तत्वज्ञान हे पुस्तक वर्गात न्यायचं आणि वाचून दाखवायचं. मी असंच करते.' बहिणीनं तिला शांतपणे उत्तर दिलं, '
'मी त्यांचीच मुलगी आहे'.
चवथं पुस्तक म्हणजे 'शैक्षणिक समस्यांचा इतिहास' हे पुस्तक १९७८ साली , श्री विद्या प्रकाशन पुणे, यांनी प्रकाशित केलं. त्या पुस्तकाच्या दोन आवृत्त्या निघाल्या आहेत. या पुस्तका पासूनच्या पुढील लिखाणाची मी साक्षीदार आहे. त्याआधी लहान असल्याने,बाबा सतत काहीतरी लिहीत असतात, एवढंच समजायचं. बाबांना पोटदुखीचा कायम त्रास व्हायचा. त्यामुळे ते जास्त वेळ बसून लिहू शकत नसत. त्यासाठी त्यांनी डाव्या कुशीवर झोपून लिहीण्याचं कसब आत्मसात केलं होतं. डोक्याखाली उंच लोड घेऊन, डाव्या हाताने रायटिंग पॅड हलू नये म्हणून आधार देत, ते दीड दोन तास सहज लिहू शकत . मी मोठी झाल्यावर मला जशी मराठी भाषेची आणि शुद्धलेखनाची समज आली, बाबा मला डिक्टेट करित असत. हॉलमध्ये फेऱ्या मारत, एक हात पोटावर ठेवून ते सांगायचे आणि मी लिहायचे. हे लिखाण कशासाठी, कुणासाठी, हा विचार त्यावेळी मला करण्याची गरजच वाटली नाही. पण त्याही वयात बाबांचं एक वैशिष्ट्य जाणवलं, की खाडाखोड, फेरफार, दुरुस्ती,रफ-फेअर - हे प्रकार त्यांच्या लिखाणात कधी नव्हतेच. त्यांच्या डोक्यातून थेट फायनल कॉपीच उतरायची. आता विचार केला की आश्चर्य वाटतं- पुस्तकांची सॉफ्ट कॉपी त्यांच्या डोक्यात कशी काय तयार असायची? कारण माझी पंधरा वीस पानं लिहून झाली की त्यावर फक्त नजर फिरवून ,ते लिखाण थेट धंतोलीतल्या बनहट्टी प्रेस मधे जायचं.प्रेसमधे लिखाण पोचवणं आणि प्रुफं आणणं - ही आमचीच कामं.
त्यांचं पाचवं पुस्तक हे 'टेस्ट ऑफ लिटररी क्रिएटिविटी'. १९७९ मध्ये, साहित्य प्रसार केंद्र नागपूर येथून प्रकाशित झालं. सर्जनशीलतेवर बाबांचा पीएचडीचा प्रबंध - पुस्तक रुपात काढला होता. या पीएचडी च्या प्रबंधासाठी, सायन्स शाखेच्या,दहावीच्या विद्यार्थ्यांमधे मराठी भाषेतली सर्जनशीलता किती प्रमाणात आहे,हे संशोधन केलं होतं.
सहावं पुस्तक, 'सर्जनशीलता'. हे १९९१ मध्ये नूतन प्रकाशन,पुणे, यांनी प्रकाशित केलं.सर्जनशीलता हा बाबांचा आवडीचा आणि प्रभुत्व असलेला विषय. या विषयावर मराठीतून एकही पुस्तक उपलब्ध नसल्याने, मराठी विद्यार्थ्यांची ही अडचण या पुस्तकामुळे बऱ्याच अंशी दूर झाली.
सातवं पुस्तक हे, 'शैक्षणिक पत्रकारिता'. १९९६ मध्ये, शिक्षण समीक्षा प्रकाशन, नागपूर, यांनी प्रकाशित केलं. पत्रकारितेमध्ये शैक्षणिक पत्रकारिता या एका नवीन संकल्पनेचा अंतर्भाव होणं गरजेचं आहे असा त्यांचा आग्रह होता. या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा,उत्कृष्ट वाङमय निर्मितीचा पुरस्कार मिळाला आहे.
ही सगळी बाबांची पुस्तकं, आजच्या पिढीच्या शिक्षकांपर्यंत जायला हवीत असं मला वाटतं. बाबांची शिक्षणाबद्दल, शिक्षणपद्धती बद्दल शिक्षकाबद्दल, मराठी भाषेबद्दल असणारी विलक्षण तळमळ या पुस्तकांमध्ये उतरली आहे. अध्यापन क्षेत्रात सतत प्रयोगशील राहून, नवनवीन संकल्पना शिक्षकांसमोर मांडण्याची त्यांची पराकोटीची सर्जनशीलता या पुस्तकांद्वारे व्यक्त झाली आहे.शिक्षण क्षेत्रातील बाबांच्या कार्याची दखल घेऊन 'नगरकर प्रतिष्ठान',पुणे तर्फे उत्कृष्ट शैक्षणिक कार्य पुरस्कार त्यांना मिळाला आहे.
हा लेख आजच्या दिवशी, मी माझ्या बाबांना समर्पित करते आहे. त्यांनी आम्हा बहिणींना सद्विचारांची, तत्वनिष्ठेची,श्रद्धेची,विनम्रतेची अक्षय संपदा प्रदान केलीय.त्याचबरोबर त्यांचं ज्ञानप्रचुर अक्षरधन ही समाजातल्या शिक्षकांसाठी त्यांनी निर्माण केलेली संपत्ती आहे.
एक मुलगी म्हणून , मी त्यांना काय देऊ शकले, हा प्रश्न मला नेहमीच छळत आलेला आहे .आता हा लेख, मी त्यांच्या हयातीत का लिहिला नाही, या प्रश्नाचाही समावेश या छळवादात झाला आहे.शेवटी बाबांचं श्रद्धास्थान असलेल्या ज्ञानेश्वरीत म्हटल्याप्रमाणे ,
न्यूनते पुरते,
करुनि घ्येयावे तुम्हाते.
विनवतु असे' .
अशी बाबांना विनवणी करते. कारण आम्हा लेकरांमधली न्यूनता वडील समजून घेणार नाहीत असं घडू शकेल कधी??
#अध्यापनशास्त्रआणिपद्धती
#शैक्षणिकतत्वज्ञानआणिशैक्षणिकसमाजशास्त्र
#मराठीचेअध्यापन
#शैक्षणिकसमस्यांचाइतिहास
#Atestofliterarycreativity
#सर्जनशीलता
#शैक्षणिकपत्रकारिता
#शिक्षणोपनिषद
#शिक्षणसमिक्षा











साधना ,
ReplyDeleteतुझे बाबा मला पक्के आठवतात .
मी अनेकदा त्यांना भेटलो आहे .
ते रंध्रारंध्रातून तळमळीचे शिक्षक होते .
महत्वाचं म्हणजे ते फार लोभस माणूस होते .
त्यांच्या सारखा अन्य कुणीही सोज्वळ आणि सालस माणूस आजवर मला भेटलेला नाही .
बाबा , आई , तू , सुषमा , प्रकाश आणि बर्डीवरचं घर , सगळं मला लख्ख आठवतं...ते सगळं माझ्या मनाच्या गाभाऱ्यात कायमच मुक्कामाला आहे .
-प्रब
साधना ,
ReplyDeleteतुझे बाबा मला पक्के आठवतात .
मी अनेकदा त्यांना भेटलो आहे .
ते रंध्रारंध्रातून तळमळीचे शिक्षक होते .
महत्वाचं म्हणजे ते फार लोभस माणूस होते .
त्यांच्या सारखा अन्य कुणीही सोज्वळ आणि सालस माणूस आजवर मला भेटलेला नाही .
बाबा , आई , तू , सुषमा , प्रकाश आणि बर्डीवरचं घर , सगळं मला लख्ख आठवतं...ते सगळं माझ्या मनाच्या गाभाऱ्यात कायमच मुक्कामाला आहे .
-प्रब
तुझे बाबा म्हणजे शिक्षण क्षेत्रातले एक समृद्ध व्यक्तिमत्त्व होते,
ReplyDeleteतुला सतत वाचतांना बघितंय मी कॉलेज मध्ये.
त्यामुळे तुम्ही तिघी समृद्ध झाल्या.
त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू नुसते झिरपले नाहीत तर तुझ्यामध्ये
अखंड झरा वाहतो आहे अस तुझ्या लिखाण नेहमी सांगत.
खुप छान भावना मांडल्यास आणि बाबांना हुबेहूब आमच्या डोळ्यासमोर उभं केलं.खुप छान...
बाबांसाठी खूप यथार्थ शब्द भेट!मॅडम तुमच्या कृतीतून अस्तित्वातून ते नक्कीच जाणवले आम्हा विद्यार्थ्यांना.
ReplyDeleteसगळ्यात भावलेली त्यांची गोष्ट म्हणजे आईला डॉक्टरेट मिळवण्यापर्यंत तिला शिक्षणासाठी उद्युक्त करणे.🙏🙏हॅट्स ऑफ
सोनल अंत।पुरकर
Great !I was totally anaware such a Great personality Sir was Happy Birthday to the legend
ReplyDeleteWow.. actually I am way too young to comment on this because I had not had much of the experience at this side of Aaba.
ReplyDeleteAbout inheriting his qualities..
His vision, thinking, his love for education were way ahead of the time. And i see exact these things in you.i am anyway 2nd in line for that inheritance,so I am not sure if I will ever be able to slightly reach to what he had achieved. But I feel lucky to be his granddaughter and I wish many times that Yukta had met him. I do miss Aaba everytime I check pulse rate and BP of any patient 😊
Mam, your father was indeed a great personality,you are carrying his legacy with the same zeal. My parents were teachers and I have seen these books mentioned by You in my house.
ReplyDelete-madhumati nawkar
बाबा कॉलेजला b.ed कॉलेज प्राध्यापक होते , हे तुमच्या बोलण्यातून माहिती होते त्यांची पुस्तकं शैक्षणिक अभ्यासक्रमात होती हेही माहीत होतं पण त्यांची प्रगल्भता आज तुमच्या लेखातून प्रकट झाली तुमच्यातही हे गुण आलेच आहेत बाबांची आणखीन छान ओळख करून दिलीत मॅडम
ReplyDeleteAmhi tumha saglyna khup jawalun pahilay.
ReplyDeleteभावना खूप सुंदर व्यक्त केल्या आहेत . नागपूर ला मी B . Ed केलं खूप वर्षांपूर्वी . ती पुस्तकांची नाव आठवली 👌👌🙏🙏
ReplyDeleteनमस्कार. आपल्याला इतके महान वडील लाभले .आपण भाग्यवती आहात. आपल्यातील लेखिका बाबांमुळेच घडली आहे हे जाणवते. प्रत्यक्षाहुन प्रतिमा उत्कट हा अनुभव आपल्या लेखनातून येतो. आपल्या वडिलांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन
ReplyDeleteवैद्य एकनाथ कुलकर्णी
आज,बाबांच्या वाढदिवसा निमित्त पाठविलेला लेख सुंदर.बाबांचा फोटो बघून, ते सतत आपल्या बरोबर असतात याची जाण आली.बर्डीच्या घरी मनाने धांव घेतली. अभिमानाने मन भरुन आलं.आपण त्यांची सुन असल्याचं भाग्य मिळालं. हे ही नसे थोडके.
ReplyDeleteतुमचे बाबा एक प्रतिभावंत लेखक,उत्कृष्ट अध्यापक....त्यांना शतशः नमन आणि तुमचे लिखाण तर निसंदेह उत्कृष्ट असते
ReplyDeleteDr. Sunita kadam kharode
Deleteपल्लवी (साधना), पितृप्रेम व्यक्त करण्याची ही पद्धत आवडली. मला एवढी बारकावे माहिती नव्हते. आपण प्रत्यक्ष भेटतो तेव्हा वेगळेच विषय बोलतो. पण हे छान झालं. तुम्ही सांगितल्यामुळे पुस्तक बघायची वाचायची ओढ लागली आहे. सुसंस्कृतता ही झिरपत तुमच्यापर्यंत आली आहे आणि तुम्ही ती पेलली आहे. बाबांना प्रणाम.
ReplyDeleteखूप छान लिहिलं,मी Bed ला असताना त्यांचीच पुस्तके वाचली होती, खूप खूप माहिती मिळायची,आज या लेखाच्या निमित्ताने मला माझ्या bed च्या दिवसांचीआठवण झाली,त्यांच्या पुस्तकांच्या वाचनाची एक अनामिक ओढ लागली होती तेव्हा,छान लिहिले साधना ताई बाबांबद्दल.🙏
ReplyDeleteअतिशय सुंदर शब्दात व्यक्तिचित्र रेखाटलंय !
ReplyDeleteत्यांच्या समृद्ध लिखाणाचा वारसाच तुम्हाला मिळाला आहे . 🙏🏻
साधना ताई...छान लिहिला आहे गँ लेख..खूपच योग्य अन् समर्पक शब्द योजना...दोन ववर्षे सतत सहवासात असूनही मैत्रिणीचे वडील ..आपल्या लहान मुलींच्या सौभद्र नाटकाचे दिग्दर्शक .खूपच अभ्यास करणारे काका अशी ओळख होती..तुझ्या लेखामुळे त्यांचँ साधेपण अजूनअधोरेखित झालं...धन्यवाद..या सुँदर लेखासाठी..
ReplyDeleteकिती सुंदर लिहिलं आहेस ! आपल्या भिडे कन्या शाळेच्या बोर्ड वरचे हे सुविख्यात शिक्षणतज्ञ, त्यांची मुलगी माझी खास मैत्रिण असल्यामुळे कुंडलेंच्या घरी मला नेहमी - कधीही जाता येतं याचा एक सुप्त अभिमान शाळेत असताना मला असायचा . त्यांचा शांत , तृप्त चेहरा , संयमी , मर्यादशील वागणूक आणि अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्व माझ्या मनावर कोरलं गेलं आहे . मात्र त्या शाळकरी वयात त्यांच्या कर्तृत्वाची तेवढी जाण नव्हती. आपल्या शिक्षिका - मुख्याध्यापिका त्यांना मानतात म्हणून ते मोठे एवढच मनात असायचं . मात्र तुझ्या या लेखाच्या निमित्ताने त्यांनी शिक्षणशास्त्रात केलेल्या भरीव कार्याचा जणू चलचित्रपटच निर्माण झाला . तुझ्या प्रेमळ , लाडक्या आणि कर्तृत्ववान बाबांची यापेक्षा गोड आठवण त्यांच्या वाढदिवसाला काय असणार ! त्यांच्या स्मृतिला विनम्र अभिवादन .
ReplyDeleteFull respect Sadhna mam.
ReplyDeleteBhavpurna Shradhanjali to your Great father...
कुंडले सरांच्या स्मृतीला अभिवादन
ReplyDelete🙏
त्यांच्या पुस्तकांचा ठेवा अमूल्य आहे
इतकी सुंदर शब्दरुपी भेट देऊन तुमच्यात त्यांचे गुण कसे आलेत हेच सिद्ध होते मॅडम
शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमटी
ReplyDeleteबाबांची आठवण रोज काहिना काही कारणाने निघतच असते आणि आई घरी असल्यामुळे तर आपण त्याच काळात आहोत असंही कधीकधी वाटत राहतं. आजच त्यांच्या काॅलेजच्या खूप आठवणी आईने सांगितल्या.
ReplyDeleteबाबांना श्रद्धांजली वाहण्याची पद्धत, तीही लेख लिहून - फार आवडली. बाबांच्या खूप खूप आठवणी जाग्या झाल्या हा लेख वाचून. त्यांचं साधं सोज्वळ व्यक्तिमत्त्व, त्यांची बुद्धिमत्ता, त्यांचं सतत कार्यरत राहणं हे सगळं ते होते तेव्हा ही दिसायचं, जाणवायचं पण त्याचं मोल आज जास्तच कळतंय. बाबांची मुलगी असणं या पेक्षा दुसरं भाग्य कोणतं?
माधवी सहजे
Mam, Very nice to know @ ur father.. Indeed a Gr88 personality!! Now I could proudly say you got inheritance from him.. liked ur unique way of tribute @ ur today's write up !! Keep writing..
ReplyDeleteनिव्वळ अप्रतिम ! पित्याला मुलीने वाहिलेली आगळावेगळी आदरांजली!
ReplyDeleteअनेक वर्षांपूर्वी पांढरे सरांनी मधुकाकांचे वैशिष्टय अतिशय समर्पकरित्या व्यक्त केले होते, त्याची आठवण झाली. ते असे- “थोड्याश्या वेळेतही त्यांची बहुश्रुतता, भरपूर वाचन, वैयक्तिक चिंतन, विचार सुबकपकणे नेमक्या स्वरूपात मांडण्याची शैली इ. बाबी प्रकर्षांने जाणवल्या. विशेषत: चर्चेच्या वेळी दुसर्याचं म्हणणं काळजीपूर्वक ऐकून घेणं, थोडं थांबून आपलं मत मांडणं, आपलं मत एक विचार म्हणून व्यक्त करणं, त्यावर विचार करून अंतिम निर्णय घेण्याचा तुमचा अधिकार अबाधित ठेवणं, प्रॅक्टिकल आणि थिअरी, व्यवहार आणि आदर्श यांची सांगड घालणं, व्यवहारासाठी आदर्शाला फाटा न देणं ..”
Khup sunder lihila aahe
ReplyDeleteआजच्या या भावपूर्ण,अर्थपूर्ण, सर्वांग सुंदर लिखाणामुळे आपल्या मध्ये सुद्धा आपल्या बाबांचा वारसा तंतोतंत आहे हे सिध्द होते.
ReplyDeleteखरच खूप सुंदर लिखाण.
प्रो.अशोक पत्की
So good article from a daughter to a good kind of father.
ReplyDeleteएक उन्मुख श्रेष्ठ व्यक्तित्व के लिए सम्मानित श्रद्धासुमन श्रद्धांजली।
ReplyDeleteशतः शतः नमन।
Very good article which beautifully defined the good n great qualities of BABA(M.B.Kundale).
ReplyDeleteA great person who had been successfully did job for humanity in Teaching field n got great awards .
Salute to a great father
N
To a great daughter.
"लिहावे शुद्ध, वाचावे,
ReplyDeleteजाणावे तदनंतरें
जाणता कळता बिंबे
बिंबता स्फूर्ती होतसे"
या संतवचनाचा सहजसुंदर प्रत्यय आपला लेख वाचताना आला. बाबा म्हणजे 'हर सवाल का सही जबाब', असं जाणवत असेल, त्याकाळात बी एड करणाऱ्या भाग्यवान विद्यर्थ्यांना. अशा थोर व्यक्तींचा परिसस्पर्श, निदान त्यांच्या कृतार्थ हाताचा एखादा स्पर्श आम्हाला ही मिळाला असता, तर --.2014 च्या 1 नोव्हेंबर ला, माझेही पिताछत्र हरवलं, त्यांचं एक छायाचित्र खरं तर प्रकाशचित्र
, मी डीपी म्हणून आजही बाळगून आहे. तुमच्या लेखाचे शीर्षक वाचूनच सद्गदित झालो होतो मी आणि म्हणूनच इतक्या उशीरा प्रतिसाद देत आहे. सर्वांच्या अंतःकरणास साद घालणारी झरणी अशीच ओसंडून वाहो ही सदिच्छा. स्व. कुंडले काकांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन 🙏🙏🙏
मॅडम, खुप छान व्यक्त झालात.... वडीलांच्या कडुन तुम्हाला मिळालेला वारसा खुप मोठा आहे... कारण तो नुसता झिरपला नाही tar अखंड प्रवाहित आहे.. बाबांच्या स्मृतीस अभिवादन 🙏व आपल्या लेखनास शुभेच्छा 👏
ReplyDeleteवैशाली देशमुख
*सुप्रभात...*
ReplyDelete🙏🏻
*"आम्हा शिक्षणशास्त्राच्या विद्यार्थ्यांना सुयोग्य दिशा देणारा देवदुर्लभ मार्गदर्शक : आदरणीय डॉ. म. बा. कुंडले सर"*
मी, बी. एड. ला आदरणीय कुंडले सरांच्या पुस्तकांतून अभ्यास केलाय. ( खरं तर मी SET उत्तीर्ण झाल्यानंतर, गरज नसतानाही, नौकरी मिळविण्यासाठी जवळ हाताशी एखादी पदवी असावी म्हणून बी. एड. ला प्रवेश घेतला... कदाचित आदरणीय कुंडले सरांच्या ग्रंथांशी भेट होण्यासाठीच, असं आता वाटतंय... काही घडामोडींचा अर्थ असा उलगडत जातो!) बी. एड. ला दुसरा मेरीट आलो, याचं श्रेय आमच्या बी. एड. च्या प्राध्यापकांसह आदरणीय कुंडले सरांच्या या ग्रंथसंपदेलाही आहे, हे मी विनम्रपणे सांगू इच्छितो. मला आताही अभ्यासाला असलेल्या या ग्रंथांची ती पारायणे लख्ख आठवतात... आज वरिष्ठ महाविद्यालयात मी जे (बऱ्यापैकी) चांगलं अध्यापन करू शकतो (असं मला वाटतं. - अहंकाराचा वारा न लागो मज राजसा...) त्यात या ग्रंथांचं मौलिक योगदान आहे., ते शब्दांत व्यक्त करता येणार नाही. आम्हा बी.एड. (आणि *शिक्षणशास्त्राच्या* सर्वच ) विद्यार्थ्यांसाठी ही पुस्तके म्हणजे शिक्षणशास्त्रातली *भगवद्गीता* आहेत. या थोर विभूतिमत्त्वाची मुलगी म्हणून मला एका अर्थाने तुमचा हेवा वाटतो. अशा विभूतिमत्त्वाची तुम्ही मुलगी आहात, कारण तुमच्यावर भाग्याची विशेष कृपा आहे. तुमच्या बाबांमधील प्रतिभेचा अंश तुमच्यात उतरला आहेच, त्याची जपणूक करा. तुमची ओघवती आणि वाचकाला लेखनात सतत गुंतवून ठेवणारी, वाचनानंद देणारी सहजसुंदर शैली हा तुमचा अनमोल ठेवा आहे. तो जपून ठेवा, लिहित राहा. तुमच्या ह्या लेखातून आदरणीय सरांविषयी खूप माहिती मिळाली. मला वाटतं तुम्ही सरांवर छानसं पुस्तक लिहावं...
तुमच्यातील हा लेखणीचा अक्षय्य झरा सतत प्रसन्नपणे आम्हाला यापुढेही आनंद देत राहावा या हार्दिक शुभेच्छांसह...
- प्रा. अभय सुभाष जोशी
पुसद | उमरखेड
मी डॉ . अर्चना अलोणी . मी अरुण जोशी शिक्षण महाविद्यालय हनुमान नगर नागपूर येथे प्राचार्य या पदावर होते . मा कुंडले सर तेथे प्राध्यापकांना मार्गदर्शन करायला यायचे . मी अध्यापन शास्त्र हाच विषय शिकवत होते त्यामुळे सरांची मी सगळीच पुस्तके वाचलेली आहेत .अध्यापन शास्त्र व पद्धती हे माझे सगळ्यात आवडते पुस्तक . त्यांचे लेखन समग्र होते .शैलीही खूप सुंदर .
ReplyDeleteमला जेव्हा पुस्तक लिहिण्याची पिंपळापुरे प्रकाशनातर्फे मागणी आली आणि त्यांनी शंभर ते दीडशे पानाचे ही पुस्तक चालेल असे म्हटले परंतु माझ्यासमोर कुंडले सरांचा आदर्श होता मी ठरवले मी तसेच पुस्तक लिहिणार आणि मी तीनशे पानांचे पुस्तक लिहिले ते अत्यंत लोकप्रिय झाले . त्याची प्रेरणा मात्र मला कुंडले सरांच्या पुस्तकातून मिळाली .
पल्लवी तुझ्या बहिणीने लेख खूप सुंदर लिहिला आहे . तिला माझ्या भावना कळव .
जन्मदिना प्रीत्यर्थ त्यांना विनम्र वंदन 🙏🏻🙏🏻
मॅडम, वडिलांच्या जन्मदिनी त्यांना भेट म्हणून आपण लिहिलेला लेख अतिशय समर्पक असा आहे.. खरं म्हणजे बीएडला असताना कुंडले सरांची पुस्तके वाचूनच आम्ही चांगले मार्क्स मिळवू शकलो होतो.. पण ते आपले वडील होते ही बाब आजच समजली आणि आपण ज्या पद्धतीने लेखांमध्ये त्यांचा जीवनपट उभा केला आहे त्यावरून आपणा दोघांविषयी चा आमचा आदर अजूनच वृद्धिंगत झाला आहे... स्व. बाबांच्या पावन स्मृतीला आमचे विनम्र अभिवादन.... धन्यवाद🙏🙏
ReplyDeleteगजानन नारे
शिक्षण हा विषय तुमच्या कुटुंबाच्या रक्तातच आहे, हे जाणवतं. डॉ. कुंडले थोर शिक्षणसेवक होते. त्यांच्याशी अनेकदा भेटण्याचे-बोलण्याचे भाग्य मला लाभले. पत्रकार म्हणून आणि नातेसंबंधातूनही. He was a thorough gentleman👍
ReplyDeleteसाधना मँडम, Thank you.
ReplyDeleteतुम्ही या लेखाद्वारे केवळ वडिलांच्या बद्दल लिहिलं असं नाही तर त्यातून आम्हाला त्यांच्या कर्तृत्वाचीही ओळख करुन दिली. नव्या पिढीला मागल्या पिढीच्या या आठवणी मार्गदर्शक ठरत असतात. त्यांचे कर्तृत्व मोठे आहेच, ते तुम्ही पण आपल्या कार्यातून वृद्धींगत करता आहात.
सीमा शेटे
खूपच सुंदर लेख लिहिला आहे साधनाताईनी....दोन वर्षे आम्ही तुमच्या बर्डीवरच्या घरी येत होतो.मैत्रिणीचे बाबा ...आपल्या सौभद्रचे दिग्दर्शक ...तेही इतक्या सहजपणे की ह्याला दिग्दर्शन म्हणतात हे कळू नये.....पण इतक्या अवघड विषयांच्या पुस्तकाचे लेखक ..हे आज कळते आहे..त्यामुळे त्यांचं साधेपण अजूनच अधोरेखित होतं... खरंच कुठेही गर्वाचा लवलेश नाही की आपण काही वेगळे आहोत हा भावही नाही...really great
ReplyDeleteशामला अमरावतकर
बाबा उमगले हा वारसाहक्क ते तुम्हास देऊन गेले आणि तुम्ही तो छान जतन करुन ठेवलात.ही ‘लेखिका’भेट बाबांसाठी विशेष असणार.
ReplyDeleteमॅम, खुप छान,धन्यवाद : बाबांना नमस्कार .
वीणा पंचभाई
साधनाताई चा लेख वाचला.
ReplyDeleteआपल्या पित्याला वाढदिवसानिमित्त इतकी चांगली भेट क्वचितच कोणी दिली असेल.
मुळात केवळ त्यांच गुणगाण करणारा लेख लिहिण्यापेक्षा
त्यांचं हे शब्द रूपी धन लोकांपर्यंत पोचवण्यची व या रुपाने वारसा जपण्याची कल्पनाच अप्रतिम.
सर्वांपर्यंत ह्या भावना नि श्चितच पोचणार.
खरच मलासुद्धा ही सगळी पुस्तकं माहिती नव्हती.
मी स्वतःला भाग्यवान समजते की माझी आणि सरांची चांगली गोष्ट होती.
इतका विद्वान माणूस इतका
साध्या स्वभावाचा असू शकतो याचे साक्षात उदा.म्हणजे सर.
त्यांना शतशः प्रणाम.
श्रीमती काकूही पि एच डी आहैत, हे आज कळले.
दोघांची एकमेकांची छान साथ होती.
श्रीमती काकूंना नमस्कार.
श्रीमती बलंग - नाशिक
साधनाताई,
ReplyDeleteतुम्ही,तुमच्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त लेख लिहून त्यांची छान ओळख करून दिली. खूप समृद्ध आणि प्रगल्भ व्यक्तिमत्व होते त्यांचे.
त्या काळात पत्नीला पी.एच. डी साठी प्रोत्साहन देणे ही खरीच मोठी गोष्ट होती. त्यासाठी त्यांना विनम्र अभिवादन.
त्यांचा लेखनाचा वारसा तुम्हाला नक्कीच मिळाला आहे. एका मुलीकडून वडिलांना यापेक्षा चांगली भेट काय असू शकणार ?
ते तुमच्यावर खुश असणार व
त्यांचे आशीर्वाद तुम्हाला आहेत.
सीमा देशपांडे
मस्त लेख. तुमच्या बाबांच्या व्यक्तिरेखेची एक झलक मला वाचायला मिळाली. खुप थोर व्यक्ती!!!
ReplyDeleteफोटो पण फार छान आहे. त्यांचा लेखनाचा वारसा तुम्हा सर्वानाच मिळाला आहे हे नक्की
वासंती पंडित
Sadhana मॅडम,संपन्न साहित्यिक वारसा तोही अध्यापन क्षेत्रातला लाभलेल्या आपण खरोखर खूप भाग्यशाली,खूप नशीबवान आहात. आपल्या वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ त्या संपदेला तुम्ही लोकाभिमुख करता आहात आणि यासारखी दुसरी श्रद्धांजली नसावी.🙏🙏🙏🙏प्रणिता गुजराथी
ReplyDeleteकाकांच्या शांत, प्रेमळ, सहवासाच्या क्षणांच भाग्य आम्हालाही लाभलं.सदैव हसतमुख, प्रोत्साहन देणारं , देखण व्यक्तीमतव लाभलेलं.मी तर त्यांना ,त्यांच्या आयुष्यातील यशाच्या उच्चतम पायरीवर ते असताना त्यांना पाहीले, त्या आधी "शालेय व्यवस्थापना" तून वाचलेले, पण इतकी मोठी व्यक्ती घरी आली आहे ,याच दडपण नसायचं, अगदी सहज वावर असायच काकांचा !अतिशय आपुलकीने वागत .काकांना प्रेमपूर्वक नमस्कार !!🙏🙏🙏
ReplyDeleteशैला मोहिदेकर
साधना,तुझ्या लेखा तून तुझ्या बाबांच्या समृद्ध व्यक्तिमत्त्वाची ओळख झाली.मागच्या महिन्यात माझे वडील गेले.
ReplyDeleteरोज त्यांची आठवण आणि अनेक विचार मनात येत राहतात.लेख वाचताना सहसंवेदना अनुभवली.खरच आपण खुप भाग्यवान आहोत.वडिलांकडून आपल्याला अमूल्य असा ठेवा मिळालेलाआहे.🙏
अनुजा तातावार
साधना तुझ्या बाबांचे नाव त्या काळच्या वृत्तपत्रात,तरुणभारतमध्ये नेहमीच झलकलेलं असायचं!खरंच खूप समृद्ध वारसा तुम्हाला दिलाय तुमच्या वडिलांनी !आणि तुम्ही तिघींनी पण तुमच्या अंगभूत सं स्कार आणि हुशारीने वडिलांच्या कर्तृत्वावर कळस चढवण्याचेच कार्य करीत आहात !खूप प्रेरणादायी आदर्श व्यक्तिमत्व तुमच्या बाबांचे होते.आणि तुमचेही आहे.त्यांच्या स्मृतीला सादर नमन !🙏🙏🌹🌹
ReplyDeleteवीणा मालशे
[19/05, 08:32] Manisha Kulkarni: खूपच कर्तृत्ववान होते तुमचे बाबा। त्यांनी लेखन निष्ठा एखाद्या व्रता प्रमाणे सांभाळली। आपल्या लेखणीतून समाजाला खूप काही दिले। तोच वारसा तुमच्याकडे आला आहे। सुंदर लेखन तुमच्या मुळे खूप छान छान लेख वाचायला मिळतात
ReplyDeleteपिता -पुत्रीचं नातचं मुळी निर्व्याज प्रेमाचं ...
ReplyDeleteत्यांच्या गुणांचा वारसा चालवून आपण त्याला योग्य न्याय दिलात.
बाबांना 🙏🙏
असेच लिहीत राहा
शुभेच्छा 😊
माया ठाकरे